शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते शरद चवरकर यांचे निधन……
शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते शरद चवरकर यांचे निधन……
कोर्लई(राजीव नेवासेकर)मुरुड तालुक्यातील मिठेखार येथील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते शरद बाळकृष्ण चवरकर यांचे वयाच्या ५२ व्या वर्षीअल्पशा आजाराने सोमवार दि.१२ ऑगस्ट २०२४ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शरद चवकर यांनी शेतकरी कामगार पक्षाचे मुरुड तालुका परोगामी युवक संघटना अध्यक्ष, मुरुड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,वळके येथील को.ए.सो. नारायण कमळ्या गायकर माध्यमिक शाळेचे चेअरमन म्हणून उत्तम प्रकारे काम केले. मनमिळाऊ आणि गोरगरीबांच्या हाकेला ओ देणारे व्यक्तिमत्त्व शरद चवरकर यांच्या मृत्यूची बातमी समजताच तळेखार ते साळाव विभागात सर्वत्र शोक व हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, आप्तस्वकीय, मित्रपरिवाराने त्यांच्या निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच त्यांच्या परिवाराचे सांत्वनदेखील केले. त्यांच्या पश्चा पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. कै.शरद चवकर यांच्या पार्थिवावर मिठेखार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांचा दशक्रिया विधी व उत्तरकार्य दि.२५ ऑगस्ट रोजी राहात्या घरी करण्यात येणार असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.