शिव आधार फाऊंडेशन वतीने उसर ठाकूरवाडी, वराठी व बेलवाडी या प्राथमिक शाळान मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्या चे वाटप……
शिव आधार फाऊंडेशन वतीने उसर ठाकूरवाडी, वराठी व बेलवाडी या प्राथमिक शाळान मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्या चे वाटप……
रोहा(संतोष सातपुते)शिव आधार फाउंडेशन रोहा ही सामाजिक संघटना संघटनेचे अध्यक्ष श्री नारायण खुळे यांच्या नेतत्वाखाली 2018 पासून विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवित असून या संघटनेचे ब्रिद वाक्य आहे गोरगरिबांचा आधार शिव आधार या उक्ती प्रमाणे शिव आधार फाउंडेशन वतीने रा.जि.प. शाळा उसर ठाकूरवाडी येथे उसर ठाकूरवाडी, वराठी व बेलवाडी या तिन्ही शाळेच्या मुलांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटपाचा कार्यक्रम पार पडला.सदरहू कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री रितेश जैन यांचा मुलगा सिध्दांत जैन च्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तिन्ही शाळेतील मुलांना खाऊचे वाटप केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिव आधार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री नारायण खुळे, सचिव श्री. निकेश पोकळे, श्री.रितेश जैन, सदस्य श्री.जगदीश मशेटे,सदस्य श्री.राकेश मोहिते,सदस्य श्री.पुर्वेश चोरगे हे उपस्थितीत होते. तसेच कार्यक्रमासाठी बेलवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.संदिप काशिनाथ चव्हाण सर,वराठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.वर्षा हिरामण दळवी मॅडम, उसर ठाकूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रमोद दिगंबर मोरे सर व उपशिक्षिका श्रीम.सोनाली प्रमोद मोरे मॅडम ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमा चे सूत्रसंचालन उसर ठाकूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रमोद दिगंबर मोरे सरांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीम.दळवी मॅडम ने सर्वांचे आभार मानून प्रमुख पाहुण्या च्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता केली.