प्रेमाच्या नावाखाली एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल…..

[avatar]

प्रेमाच्या नावाखाली एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल…..

रोहा(विशेष प्रतिनिधी) रोहा रेल्वे स्टेशन जवळील रोहिदास नगर येथे राहाणा-या एका २४ वर्षाच्या नराधमाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने एकच संताप व्यक्त झाला. आरोपी सुल्तान शेख वय २४ वर्षे  याने अल्पवयीन मुलीच्या घरी ओळखीचा फायदा घेवून तीचे अज्ञान पणाचीसंधी साधुन तीचेशी जवळीक करून तीस प्रेमाच्या जाळ्यात ओढुन गेल्या दोन वर्षापासून तीचे सोबत शरीर संबंध प्रस्थापीत केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी आरोपीला अटक केल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली.

मंगळवार दि.२३/०७/२०२४ रोजी दु. १.४१ वा. रोहा रेल्वे स्टेशन जवळील रोहिदास नगर येथे राहाणा-या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली. आरोपी सुल्तान शेख याचे फिर्यादी यांच्या घरी येणेजाणे होते. यातील पीडीत अल्पवयीन मुलगी ही त्याला ओळखत होती. आरोपीने पीडीत अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाची संधी साधुन तीचेशी जवळीक वाढवत तिला प्रेमाच्या जाळयात फसवुन तीचे सोबत शरीर संबंध प्रस्थापीत केले. याबाबत फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या आईला समजल्यानंतर आरोपीने फिर्यादी व अल्पवयीन मुलीस जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलीच्या आईने याबाबत रोहा पोलिसात फिर्याद दाखल केली.  तदनंतर आरोपीला रोहा पोलिसांनी तातडीने अटक केली.

यातबाबत रोहा पोलीस ठाण्यात गु.र.नं १४८/२०२४, भा.न्या.सं.का.२०२३ कलम ६५(१), ३५१ (२) बालकाचे लैगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८,१२ प्रमाणे रोहा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक  देवीदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस करत आहेत.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close