रोहा उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ नसल्याने महिलांची परवड खुद बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांचा बालेकिल्ल्यात, स्त्रियांसाठी डॉक्टर नाही….. 

[avatar]

रोहा उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ नसल्याने महिलांची परवड खुद बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांचा बालेकिल्ल्यात, स्त्रियांसाठी डॉक्टर नाही…..

रोहा (संतोष सातपुते)रोहा शहरात भले मोठी इमारतीची उपजिल्हा रुग्णालय बांधवण्यात आले आहे मात्र या ठिकाणी आरोग्य सुविधाच वनवा असून चक्क या रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ नाही हे गेल्या कित्येक वर्षापासून स्त्रिरोग तज्ञ नाही आहे धक्कादायक बाब समोर आल्याने महिलांची आरोग्य विषयी परवड सुरू असल्याचा दिसून येत आहे पुन्हा सरकारी उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन आहे पण टेक्निशियन नसल्याने तेही बंद आहे.जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी अशी सावित्रीची लेक जिजाऊची लेक तिला साधी रोह्यात उपचार मिळू शकत नाही ही शोकांतिका आहे.

महिलांना आरोग्य विषयक खूप समस्या असतात गरोदरपणात सुद्धा त्यांना बाळाला उपचाराची गरज असते अशा वेळेस शासकीय दवाखान्यात सुविधा नसल्याने महिलांना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागत आहेत शासन अनेक योजना राबिवित असतो याचा महिला लाभ घेत असतात मात्र आज मुलगी शिकली प्रगती झाली असे म्हणण्यात पण रोह्यात याच मुलीला साधी उपचार मिळत नाही ही खंत आहे

खाजगी रुग्णालयात सर्वसामान्यांची धाव असते त्यामुळे श्रीमंत वर्गाला याची झळ बसत नाही त्यामुळे सरकारी आरोग्य यंत्रणा गोरगरिबांना उडवा उडवीचे काम करीत असते.

यामुळे खाजगी दवाखान्यांचे उकल पांढरे होत आहे सध्या बाळंतपण तर एवढे महागले की नको रे बाबा मुल अशीच म्हणायची वेळ आली आहे फार सिजर हा हमखास एक गरीब महिलांना खाजगी डॉक्टर यांनी आणि 75000 सांगितल्यावर त्यांनी अलिबाग रुग्णालयात धाव घेतली
कारण पैशाचे सोंग घेता येत नाही अलिबागला 10 हजारात काम भागलं विषय काय तीच सुविधा रोह्यात असती तर त्या महिलेची नातेवाईकांची धावपळ थांबली असती त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सुविधा कधी मिळतील याकडे सामाजिक राजकीय संघटना लोकप्रतिनिधी हे लक्ष घातले पाहिजे जेणेकरून महिला रुग्णांचे हाल थांबतील.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close