सर एस.ए.हायस्कूल व म.ल.दांडेकर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा सन्मान…डॉ.अमित दांडेकर यांच्यातर्फे हुशार होतकरू विद्यार्थ्यांना रोख रक्कम व पारितोषिक……
सर एस.ए.हायस्कूल व म.ल.दांडेकर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा सन्मान…डॉ.अमित दांडेकर यांच्यातर्फे हुशार होतकरू विद्यार्थ्यांना रोख रक्कम व पारितोषिक……
कोर्लई(राजीव नेवासेकर)मुरुडच्या जंजिरा विद्या मंडळ संचलित सर एस. ए. हायस्कूल व म.ल.दांडेकर महाविद्यालयात विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात शैक्षणिक उपक्रमात डॉ.अमित दांडेकर यांच्यातर्फे दरवर्षी हुशार व होतकरू विद्यार्थी व विद्यार्थीनींना रोख रुपये ५०००/-.व पारितोषिक यंदा कु.ऋग्वेद बुल्लू व कुमारी सायली सारळे यांना आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सर.एस.ए.हायस्कूल व स्वर्गीय म.ल. दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक सरोज राणे यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता पाचवी ते बारावी विद्यार्थी शिक्षक पालक सहविचार सभा
घेण्यात आली.
सुरुवातीला पालकांमधून अध्यक्ष साळी व सहसचिव म्हणून स.व जोशी व शिक्षकामधून मिनाक्षी घुगे यांची यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पालक संघाचे सचिव समीर माळी यांनी अहवाल वाचन केले. मुख्याध्यापक सरोज राणे यांनी प्रास्ताविक केले.
दरवर्षीप्रमाणे शिक्षक पालक संघाच्या पहिल्या पालक सभेमध्ये शाळेचे माजी विद्यार्थी डॉ .अमित दांडेकर हे शाळेतील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना रोख रक्कम देतात यावर्षी सुद्धा शाळेतील मुलांमधून एक व मुलींमधून एक अशा दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.यंदा कु.ऋग्वेद बुल्लू व कुमारी सायली सारळे यांना प्रत्येकी ५०००/-देण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक मोरे सरांनी पालकांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपाली रोटकर यांनी केले तर सचिव समीर माळी यांनी आभार मानले.