नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 18 विद्यार्थी अप्रेंटिससाठी थरमॅक्स कंपनीत…….
नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 18 विद्यार्थी अप्रेंटिससाठी थरमॅक्स कंपनीत…….
नागोठणे(महेंद्र माने)येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील 18 विद्यार्थ्यांची खोपोली येथील थरमॅक्स लिमिटेड (केमिकल) या कंपनीत अप्रेंटिससाठी निवड करण्यात आली.
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी थरमॅक्स लिमिटेड (केमिकल) या कंपनी 2010 पासून 2024 पर्यंत गेली पंधरा वर्षे कॅम्पस इंटरव्यू घेत अप्रेंटिससाठी निवड करते.या वर्षीही कंपनीचे एच आर मॅनेजर शशिकांत साळुंखे ,प्रोडक्शन मॅनेजर महेंद्र तांडेल व मेंटनस मॅनेजर अशोक पाटील यांनी 30 जुलै रोजी संस्थेत येऊन एओसीपी व एमएमसीपी या दोन ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यू घेतली. त्यातील एओसीपीचे पाच व एमएमसीपीचे तेरा असे एकुण अठरा प्रशिक्षणार्थ्यांची अप्रेंटिससाठी निवड करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्राचार्य विद्या पाटील, संस्थेचे फोरमन सिद्धार्थ भगत यांच्यासह सुप्रिया ठाकुर,नरेंद्र वारे,प्रशांत पाटील, सुधीर बाईत यांनी अभिनंदन केले.