घराचे कौले काढून पावणे चार लाखाची चोरी घरात कोणी नसल्याचा घेतला फायदा……
घराचे कौले काढून पावणे चार लाखाची चोरी घरात कोणी नसल्याचा घेतला फायदा……
नागोठणे(महेंद्र माने) येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेण तालुक्यातील मुंढाणी – बेणसे येथील नामदेव घासे यांच्या घराचे कौले काढून साधारण 03,76,600/- रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मुंढाणी – बेणसे येथील नामदेव हिराजी घासे हे 28 जुलै सकाळी 06.00 वा. ते 30 जुलै दुपारी 02.45 च्या दरम्यान नेरूळ येथे आपल्या मुलाकडे राहायला गेले होते. त्या दरम्यान घरात कोणी नाही याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराची कौले काढून आत प्रवेश करीत 1) 1,75,000 /- रुपये किंमतीची सात तोळे वजनाची एक सोन्याची गंथन,2) 1,00,000 /- किंमतीच्या चार तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, 3) 25,000/- किंमतीच्या दहा ग्राम वजनाच्या कानातील चैन,4) 25,000/- किंमतीच्या दहा ग्राम वजनाच्या कानातील कुडी, 5) 50,000/- रुपयांचे 500 च्या नोटा, 6) 16,00/- रुपयांचे 500,200,100 व 50 रुपयांच्या नोटा असा एकुण 03,76,600/- रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे.सदरील गुन्ह्याची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय प्रमोद कदम करीत आहे.