पहिल्या पावसाळ्यातच डांबरीकरण रस्त्याची खडी बाहेर : साळाव -मुरुड रस्त्यावरील प्रकार वाहनचालक व प्रवासी वर्गातून नाराजी…..
पहिल्या पावसाळ्यातच डांबरीकरण रस्त्याची खडी बाहेर : साळाव -मुरुड रस्त्यावरील प्रकार वाहनचालक व प्रवासी वर्गातून नाराजी…..
कोर्लई(राजीव नेवासेकर)साळाव -मुरुड -आगरदांडा रस्त्याचे डांबरीकरण होऊन काही महिने होतात न होतात तोच पहिल्या पावसाळ्यातच विहूर ते मजगांव गावठाण रस्त्यावर डांबरीकरण रस्त्याची खडी बाहेर आल्याने वाहन चालकांची डोकेदुखी ठरत असून नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी साळाव -मुरुड -आगरदांडा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.मागील आठवड्यापासून पडत असलेल्या जोरदार पावसाने या रस्त्यावर विहूर -मोरे ते मजगांव गावठाण दरम्यान रस्त्यावर वळणावर डांबरीकरण रस्त्याची खडी बाहेर आल्याने वेळप्रसंगी अपघाताची भिती व्यक्त केली जात आहे.पहिल्या पावसाळ्यात रस्त्याच्या दुरावस्थे बाबत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची चर्चा ऐकिवात येते आहे.
साळाव -मुरुड -आगरदांडा रस्त्यावर याठिकाणी रस्त्यावर आलेल्या खडीमुळे वेळप्रसंगी टू -व्हीलर घसरुन अपघाताची शक्यता लक्षात घेऊन शासनाच्या संबंधित बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.