यशश्री शिंदेच्या मारेक-यांना फाशी द्या…अन्यथा अशा प्रवृत्तीना जागीच ठेचून काढलं पाहिजे-आ.प्रशांत ठाकूर…  सकल हिंदू समाजाने काढली निषेध रॅली….. 

[avatar]

यशश्री शिंदेच्या मारेक-यांना फाशी द्या…अन्यथा अशा प्रवृत्तीना जागीच ठेचून काढलं पाहिजे-आ.प्रशांत ठाकूर… सकल हिंदू समाजाने काढली निषेध रॅली…..
पनवेल(विशेष प्रतिनिधी)उरण येथील यशश्री शिंदे हिच्या हत्येचा सर्वत्र निषेध करत संताप व्यक्त केला जात असताना पनवेलमध्येही सकल हिंदू समाजाने निषेध रॅली काढत मारेक-याला फाशी देण्याची मागणी केली.तर लोकशाहीमध्ये अशा वृत्तीला जागीच शिक्षा देण्याची तरतूद नाही अन्यथा अशा वृत्तीला ठेचून काढले पाहिजे असे संताप आ.प्रशांत ठाकूर यांनी या निषेध रॅलीवेळी व्यक्त केला.
आ.ठाकूर पुढे म्हणाले की, आपण एकत्र जमून शासन व्यवस्थेला जागं करत आहोत.महिलांना वाईट वागणूक देणारे आपल्या समाजात राहिले तर तो समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही.न्याय व्यवस्था आरोपीला शासन करण्याचे काम करेल पण आपण अशा प्रवृत्ती वाढू नयेत म्हणून आपण जागरूक राहिले पाहिजे.लव जिहाद विरूद्ध कठोर कायदा येणे आवश्यक असल्याचे सांगत आपणही यासाठी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे ते शेवटी म्हणाले. तर हा खटला फास्टट्रॅक कोर्टात होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण मागणी करू असेही ते म्हणाले.
सकल हिंदू समाजाचे निलेश पाटील यांनी, पनवेलमधील हिंदू समाज संयमाने राहतो म्हणून प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर तो आक्रमक होण्यास वेळ लागणार नाही असे सांगितले.
ही निषेध रॅली अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून निघून शहराच्या मध्यातून टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रॅलीची सांगता झाली.या रॅलीत ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची विशेष उपस्थिती होती.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close