कोवीशिल्ड वॅक्सीनने जगाला जीवनाचा नवा किरण दाखविला – चेअरमन किशोर जैन…भा.ए.सोसायटीमध्ये कॅन्सर अवेअरनेस या विषयावर गेस्ट लेक्चर…..
कोवीशिल्ड वॅक्सीनने जगाला जीवनाचा नवा किरण दाखविला – चेअरमन किशोर जैन…भा.ए.सोसायटीमध्ये कॅन्सर अवेअरनेस या विषयावर गेस्ट लेक्चर…..
नागोठणे(महेंद्र माने)येथील भारतीय एज्युकेशन सोसायटी इंस्टीट्युट ऑफ फार्मसी या महाविद्यालयात सोमवार 29 जुलै रोजी संस्थेचे चेअरमन किशोर जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅन्सर अवेअरनेस या विषयावर सेरम इन्स्टिट्यूटचे रायगड डीव्हीजन सिनियर एरिया बिझिनेस मॅनेजर सुधीर द्रविड व टेरेटरी बिझिनेस मॅनेजर महेश केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संस्थेचे चेअरमन किशोर जैन यांनी कोवीशिल्ड वॅक्सीनने जगाला जीवनाचा नवा किरण दाखविला असल्याचे सांगितले.
जगात कर्करोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या वरील उपाय लक्षात घेता कर्करोगविषयी जनसामान्यत जागृती निर्माण करणे महत्त्वाचे आहे. कर्करोग विशेषतः सर्विकल कर्करोग होऊ नये यासाठी सेरमने बाजारात नवीन वॅक्सीन आणली आहे. त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जन जागृती करणे आणि त्यांना वॅक्सीन घेण्यासाठी प्रवृत्त करणे या उद्देशाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या सुरूवातीला किशोर जैन यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कोवीशिल्ड वॅक्सीनने कोव्हिड महामारीमध्ये जगाला जीवनाचा नवा किरण दाखविले असून ते आणणारे सेरंम इन्स्टिट्यूटचे विशेष आभार मानत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात सुधीर द्रविड व महेश केळकर यांनी कर्करोग सारख्या आजारा विषयी सखोल माहिती दिली. व व्हॅक्सीनचे डोस कसे घ्यावेत या बद्दल योग्य मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी लेक्चरच्या शेवटच्या तासामध्ये प्रश्न उत्तरे घेऊन विद्यार्थ्यांच्या अनेक समस्याचे निराकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी प्राचार्य समीर पवार, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,विद्यार्थी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रा. सायली बुधवंत यांनी केले असून सूत्रसंचालन प्रा. मृगांका म्हात्रे तर आभार प्रदर्शन प्रा. अन्वी ठमके यांनी केले.