रोहा तालुका कुणबी समाज तालुका कार्यकारणीची सभा मोठया उत्साहात संपन्न…… 

[avatar]

रोहा तालुका कुणबी समाज तालुका कार्यकारणीची सभा मोठया उत्साहात संपन्न……

कोलाड ( श्याम लोखंडे ) कुणबी समाजोन्नोती संघ मुबंई ग्रामीण शाखा रोहा तालुका कार्यकारणी तसेच विभागीय कार्यकारणी यांची सभा सोमवारी २९ जुलै रोजी स्व.माजी आमदार पा.रा.सानप कुणबी भवन रोहा येथे रोहा तालुका अध्यक्ष रामचंद्र सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठया उत्साही वातावरणात पार पडली.

यावेळी चणेरा विभाग ,धाटाव विभाग,कोलाड विभाग,ऐनघर विभाग, नागोठणे विभाग,सोनगाव विभाग, मेढा विभाग, खांब विभागासह तालुक्यातील कुणबी समाज ग्रुप अध्यक्ष व कार्यकरणी मोठया संख्येने उपस्थित होते.तसेच सभेच्या सुरवातीला यावेळी कुणबी समाज नेते, शिक्षण महर्षी, तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कै.रामचंद्र पोटफोडे(मास्तर) शिरवली, धामणसई पंचक्रोशी वारकरी संप्रदायाचे संस्थापक व समाजाचे मार्गदर्शक कै. रघुनाथ होणाजी भोकटे गावठाण व इतर ज्ञात अज्ञात सामाजिक बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

तालुका सरचिटणीस सतिश भगत यांनी उपस्थित समाज पदाधिकारी व समाज बांधव यांचे स्वागत केले.तर उपस्थीत सभेत रोहा तालुका कुणबी समाज अध्यक्ष रामचंद्र सकपाळ यांनी मार्गदर्शन करतांना कुणबी समाज सामजिक सभागृह विषय असलेल्या अडचणीतून मार्ग कसा काढण्यात आला हे सांगितले तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या कडे kजातीच्या दाखवल्या संदर्भात जे निवेदन दिले आहे त्यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उमुख्यमंत्र्यांसह सोबत चर्चा करण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे जाहीररीत्या उपस्थीत सभाग्रहाला माहिती दिली. यावेळी समाज नेते तथा उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष शंकरराव म्हसकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्रजी फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीचे तसेच चर्चेचे इतिवृत्त व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिलेले निवेदन याबाबतची माहिती दिली. कुणबी समाज उपाध्यक्ष अनंत थिटे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सांगितले.तसेच यावेळी निवास खरीवले यांनी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी यांचे शालेय तसेच उच्च तंत्र शिक्षणासाठी प्रवेश घेतेवेळी ओबीसी दाखल्यांच्या अभावामुळे येणाऱ्या अडचणींवर लवकरच मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत मांडले.तर महेश ठाकुर यांनी निवेदन देऊन जर काही उत्तर दिले जात नसेल तर रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले .

यावेळी अध्यक्ष रामचंद्र सपकाळ, समाज नेते शंकरराव म्हसकर, गोपीनाथ गंभे, रामचंद्र चितळकर,खेळू ढमाल, गुणाची पोटफोडे आदी मान्यवर उपस्थित आयोजित सभेत सतीश भगत ,महेश बामुगडे, शशिकांत कडु,गुणाजी पोटफोडे, ज्ञानेश्वर दळवी,संदेश लोखंडे,दत्ताराम झोलगे,अरुण आगले सर, राजेश कदम,या सर्वांनी विविध भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आपले मनोगत व्यक्त केले.तर सदरच्या सभेमध्ये कुणबी जातीचा दाखला साठी तालुका तसेच विभागावर युवक व महिला कमेटी तालुका व विभागवार निवड करणे, समाजाच्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी आदर्श नियमावली, समाज संघटित होण्यासाठी विविध उपक्रम घेणे, विभागवार बैठका घेणे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close