रोहा किराणा व्यापारी मंडळाचे पहिले अध्यक्ष जेष्ठ व्यापारी मानमल बोराणा यांचे निधन…..
रोहा किराणा व्यापारी मंडळाचे पहिले अध्यक्ष जेष्ठ व्यापारी मानमल बोराणा यांचे निधन…..
रोहा(विशेष प्रतिनिधी)रोहा किराणा व्यापारी मंडळाचे
पहीले अध्यक्ष तथा जेष्ठ व्यापारी मानमल जी शेठ बोराणा यांचें वयोवृद्ध काळाने तसेच अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले निधनासमयी ते ८४ वर्षाचे होते. मानमलजी शेठ बोराणा यांचें जाण्याने बोरणा कुटुंबात दुःखाचे डोंगर तर व्यापारी वर्गात शोककळा पसरली आहे.जेष्ठ विचारवंत व्यापारी सह प्रेमळ स्वाभावि सल्लागार गमावला ही पोकळी भरून न निघनारी आहे मागील काळात मानमल जी बोराणा यांना उत्कृष्ट व्यापारी व उत्कृष्ट समाज सेवक म्हणून रोहा तालुका वृत्तपत्र लेखक आणि पत्रकार संघाकडून त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मानमलजी बोराणा यांनी शून्यातून विश्व निर्माण करणे असे त्यांचे व्यक्तीमत्व होते.
बोराना यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्ययात्रेला लोकप्रतिनिधी, व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील सर्व स्तरातील दुःखी जनसमुदाय भारी संख्येने उपस्थित होते त्यांच्या पश्चात तीन मुले प्रवीण बोराणा, मनोज बोराणा, सुरेश बोराणा एक मुलगी जावई सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या अंत्यविधी च्या वेळी धनगर आळी ग्रामस्थ तर्फे व रोहा शहर किराणा व्यापारी मंडळा तर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.