ग्रामपंचायत कर्मचार्यांनी पुरातील पाण्यात अडकलेल्या 200 ते 250 बकर्यांना दिले जिवदान…..
ग्रामपंचायत कर्मचार्यांनी पुरातील पाण्यात अडकलेल्या 200 ते 250 बकर्यांना दिले जिवदान…..
नागोठणे(महेंद्र माने) अंबा नदीला नुकताच आलेल्या महापुरात मोहल्ला भागात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 200 ते 250 बकर्या बकर्या ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कर्मचार्यांनी पाण्यात होडीच्या सहाय्याने जाऊन शेकडो बकर्यांना दिले जिवदान दिले. त्यांच्या या धाडसाचे शहरासह विभागातून कौतुक होत आहे.
गुरुवार 25 जुलै रोजी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली.व पुराचे पाणी एस.टी.स्थानक, विभागीय शिवसेना शाखेच्या मागे,मरिआई मंदिर समोरील परिसर, मटण मार्केटची मागील बाजू, हॉटेल लॅकव्हयू व सरकारी विश्राम गृहाच्या समोरील रस्त्यावर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले.ते रात्री 2.00 ते 2.30 नंतर छत्रपती शिवाजी महाराज बाजारपेठ,दोन्ही कोळीवाडा मोहल्ल्याच्या काही भागात शिरले. एस.टी.स्थानकाशेजारील व शिवाजी चौकातील छोटे छोटे टपरीवाले तसेच पेठेतील सर्व व्यापारी,कोळीवाडा व मोहल्ल्यातील नागरिकांनी आपले घर व दुकांनातील सर्व सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात करत पूर्ण रात्र जागून काढली.त्यातच ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे यांना अकलाक पानसरे व अनवर पानसरे यांच्या शेकडो बकर्या पुराच्या पाण्यात अडकल्याचे समजताच त्यांनी हरेश शिर्के,शुभम राऊत,रोहित महाले,सुशील मोहिते, समाधान सोनावणे या आपल्या ग्रामपंचायत कर्मचार्यांना पुराच्या पाण्यात होडीच्या सहाय्याने पाठऊन संतोष जोशी व अमोल ताडकर यांच्या मदतीने 200 ते 250 बकर्यांना जिवदान दिले. त्यांच्या या धाडसाचे शहरासह विभागातून कौतुक होत आहे.