अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिशूविहार प्राथमिक शाळेचा ६३ वा वर्धापनदिन….. 

[avatar]

अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिशूविहार प्राथमिक शाळेचा ६३ वा वर्धापनदिन…..

कोर्लई(राजीव नेवासेकर)अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिशूविहार प्राथमिक शाळेचा ६३ वा वर्धापनदिन संस्थेचे अध्यक्ष बळवंत वालेकर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. गोपाळराव लिमये यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन सरस्वती पूजनाने कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.
शिक्षण प्रसारक मंडळाची शिशूविहार शाळा १ जुलै १९६१ रोजी सुरू झाली . सदर शाळेचे उद्घाटन जे. एस्. एम्. काँलेजचे तत्कालीन प्राचार्य आर्. टी. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले होते. अ. ता. शि. प्र. मंडळाची १९३७ साली स्थापना झाली.या संस्थेची वाडगाव ((अलिबाग) येथे पहिली शाळा सुरू झाली,शाळेचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या शुभहस्ते झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विधानसभेचे सभापती नानासाहेब कुंटे होते .
शाळेच्या ६३ वर्षाच्या वाटचालीबाबत संस्थेचे अध्यक्ष बळवंत वालेकर , प्रमुख अतिथी ॲड. गोपाळराव लिमये व विद्यार्थिनी कुमारी सान्वी देवेंद्र बंदरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक ॲड.प्रवीण ठाकूर,सुकुमार भगत,सुषमा सोमण,शिक्षिका सीमा तांडेल, शालेय समिती अध्यक्षा माधुरी बोत,पालक दक्षता कारेडे,पल्लवी लांबे,संगिता क-हाडकर,निलेश शिवलकर,देवेंद्र बंदरी,आर्यन वालेकर,स्वप्नाली ओव्हाळ व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. संस्थेचे सेक्रेटरी द.ल.माळवी यांनी प्रास्तविक केले तर मुख्याध्यापिका कल्याणी वेखंडे यांनी आभार मानले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close