रायगड जिल्हा परिषद शाळा चोरढे मराठी येथे साकारला वह्या वाटप कार्यक्रम……

[avatar]

रायगड जिल्हा परिषद शाळा चोरढे मराठी येथे साकारला वह्या वाटप कार्यक्रम……

चणेरा(सत्यप्रसाद आडाव) चोरढे ग्रामपंचायत अंतर्गत सावरोली येथील प्रभात पतसंस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन वह्या, इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार वह्यांचे वाटप करण्यात आले. शाळेतील ९८ विद्यार्थ्यांना ३२ डझन व यांचे वाटप करण्यात आले. ” चांगले लोक चांगली पतसंस्था हे ब्रीद वाक्य ” ठेवून पतसंस्थेचे कार्य चालवले जाते. पंचक्रोशीत ही पतसंस्था चांगली नावारूपाला आलेले आहे. परिसरातील गरीब गरजू लोकांना आपले हक्काचे पतसंस्था म्हणून ही पतसंस्था नावारुपास आहे. पतसंस्थेकडून चणेरा, धोंडखार , तळेखार , चोरढे , वाघुळवाडी शिरगाव येथील विद्यार्थ्यांना जवळपास ८८ डझन वह्याचे वाटप करण्यात आले. वह्यावाटप करण्यासाठी सन्माननीय नितीन डाके, ऍडव्होकेट सचिन पाटील, सुरेश पाटील, दीपक गीते, गोविंद शिंगरे,अनिल पाटील, यश केमसे आदी मान्यवर उपस्थित होते. वह्यावाटप कार्यक्रमाचे योग्य नियोजन शिक्षक वृंद संगीता भगत, विजय जाधव, प्रतिभा वर्तक, राजेंद्र नाईक, रमेश सुभेदार, जयश्री पंची यांनी केले. प्रभात पतसंस्थेसारख्या पतसंस्था गरजू विद्यार्थ्यांसाठी नेहमी धावून येतात याबाबत त्यांचे धन्यवाद.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close