मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालय आंतरराष्ट्रीय योग दिवस…… 

[avatar]

मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालय आंतरराष्ट्रीय योग दिवस……

कोर्लई(राजीव नेवासेकर) मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा कला व वाणिज्य महाविद्यालयात आज दि.२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण भारतामध्ये १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस “स्वतःसाठी आणि समाजासाठी योग” या संकल्पनेने साजरा करण्यात येत आहे .
अंजुमन इस्लाम जंजिरा पदवी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि क्रीडा विभाग यांच्यातर्फे आज दिनांक २१ जून २०२४ रोजी प्रभारी प्राचार्य डॉ. साजीद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिवशी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी प्रसिद्ध योग प्रशिक्षक डॉ. निशा गोडसे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले आणि त्याचबरोबर ऑनलाइन शिबिरांद्वारे योगाचे विशेष आसने, विद्यार्थी आणि शिक्षकांना योगाचे मानसिक आणि आध्यात्मिक फायदे समजावून सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. फिरोज शेख, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शोएब खान व विद्यार्थी प्रतिनिधी हुमेरा घारे, सहिमा मुकादम, अरफा कलबसकर यांनी परिश्रम घेतले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close