कालवा दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये निधीचा अपव्यय, ठेकेदारांना मलिदा ? चौकशीच्या मागणी…कामे अपूर्णच, आश्वासन पुन्हा हवेतच !… 

[avatar]

कालवा दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये निधीचा अपव्यय, ठेकेदारांना मलिदा ? चौकशीच्या मागणी…कामे अपूर्णच, आश्वासन पुन्हा हवेतच !…

रोहा(विशेष प्रतिनिधी)– कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याच्या दुरुस्तीवर आतापर्यंत करोडोंचा निधी खर्च करण्यात आला. त्यातून कालवा दुरुस्तीची मोठी कामे पूर्ण करण्यात आली. तरीही तब्बल ५ दशके कालव्याची दुरुस्ती करण्यात न झाल्याने कालवा अक्षरशः निकामी झाला होता. मागे गाजलेल्या कालवा काँक्रिटीकरण घोटाळा प्रकरणात फक्त ठेकेदार, अधिकारी मुख्यतः नेतेगण मालामाल झाले हे सर्वश्रत आहे. आता त्याचाच कित्ता अक्षरशः गिरविला जातोय की काय ? अशीच शंका उपस्थित झाली. बळीराजा फाउंडेशनच्या ग्रामस्थांनी मागील ३ वर्षापासून पाण्यासाठीचे आंदोलन अधिक प्रभावी केले. आंदोलन, मोर्चा उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले. त्यानंतर कालव्याच्या दुरुस्तीसाठी करोडोंचा निधी मंजूर झाला. त्यातून मोठी कामे मार्गी लागली, तरीही कालवा सफाईवर सलग दोन वर्षे लाख रुपये खर्ची पाडले, कालव्याला पाणी सोडणे शक्य नसताना साफसफाई का करण्यात येते ? याच आश्चर्यातून दुरुस्ती व साफसफाईच्या नावाखाली लाखो रुपये निधीचा अक्षरशः अपव्यच झाला, याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित करून सफाई म्हणजेच ठेकेदारांना मलिदा , हेच आहे. निकृष्ट कामे, सर्वच कामांच्या चौकशीच्या मागणीवर आम्ही आता ठाम आहोत, दुसरीकडे सर्वच आश्वासन न पाळण्याच्या पाटबंधारे अधिकाऱ्यांना प्रसंगी जाब विचारणार अशी संतप्त प्रतिक्रिया बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी व्यक्त केली. दरम्यान, लांढर हद्दीतील कालव्याची खांडी जैसे थे असल्याने लगतच्या लाखो रुपये खर्चित एस्कॅपची नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली तर कार्य अभियंता मिलिंद पवार यांनी आश्वासीत केलेली कामे अपूर्णच आहेत, कामे झालीच नाही. त्यामुळे आश्वासन हवेतच विरले, हे पुन्हा समोर आल्याने विभागात ग्रामस्थांनी खेद व्यक्त केला आहे.

आंबेवाडी ते निवीपर्यंतच्या कालव्याचे पाणी आंदोलन चांगलेच गाजत आले आहे. विभागीय कालव्याला पाणीच नसल्याने परिसराला वाळवंटी अवकळा येते. पशुपक्षी, गुरेढोरे पाणी पाणी करत असतात. दुबार भातशेती इतिहासजमा झाली. शेकडो झाडांनी माना टाकल्या, पोल्ट्री, कलिंगड, भाजी व्यवसायिक मेरकुटीला येतात. त्यामुळे कालव्याचे पाणी पूर्ववत करावे ही मागणी सातत्यपूर्ण आहे. पाण्यासाठी बळीराजा फाउंडेशनचे ग्रामस्थांनी दरवर्षी वारंवार आंदोलन, मोर्चा, उपोषण केले. त्यावर कालव्याची दुरुस्ती होऊ द्या, पाणी सुरळीत सुरू करू याच आश्वासनपलिकडे पाटबंधारे प्रशासनाने अधिक केले नाही. त्यातही कालवा दुरुस्तीची मोठी कामे मार्गी लागली. अशात कालव्याला पाणी सोडले जाणार नसताना लाखो रुपये खर्च करून कालव्याची थातूरमातूर सफाई का केली जाते ? याबाबत कायम आश्चर्य आहे. दुरुस्तीतील कालव्याला ठिकठिकाणी खांडी गेल्या, लांढर येथिल सायपनला मागील वर्षी गेलेली खांडी जैसे थे असल्याने कालव्याचा लाखो रुपये खर्चिक सायपनला धक्का बसल्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. कालव्याच्या साफसफाईवर आतापर्यंत लाखो रुपये निधी खर्च करण्यात आला. त्याचे काहीच फलित नाही. केवळ ठेकेदारांसाठी हा मलिदा देण्यात आला असा आरोप अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी केला. पावसाळ्यापूर्वी तळाघर हद्दीतील कालवा दुरुस्तीकामे करण्याचे आश्वासन कार्य अभियंता मिलिंद पवार यांनी दिले होते. ते काम झालेच नाही. आश्वासन हवेतच विरले, आता निकृष्ट कामे, साफसफाईच्या नावाखाली निधी अपव्यय प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणार, असे मोरे यांनी पुढे सांगितले. दरम्यान, आंबेवाडी ते नेवी कालव्याला पाणी आणण्यासाठी पाऊस संपताच ऑक्टोबर महिन्यात बळीराजा फाऊंडेशन अधिक प्रभावी आंदोलन उभे करेल, असे सुतोवाच मिळाल्याने जानेवारी मध्यान्ह कालव्याला पाणी येण्याची अपेक्षा पुन्हा एकदा व्यक्त झाली आहे‌.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close