कु.सिद्धेश पवार हा रशिया येथील युनिव्हर्सिटी मध्ये एम.बी.बी.एस. परीक्षेत उत्तीर्ण…… 

[avatar]

कु.सिद्धेश पवार हा रशिया येथील युनिव्हर्सिटी मध्ये एम.बी.बी.एस. परीक्षेत उत्तीर्ण…… 

माणगांव(महेश शेलार) माणगावचे कार्यक्षम आणि लोकप्रिय नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांचे कनिष्ठ सुपुत्र कुमार सिद्धेश ज्ञानदेव पवार हा रशिया येथील युनिव्हर्सिटी मध्ये एम.बी.बी.एस. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन डॉक्टर झाला आहे.

सिद्धेश हा अतिशय हुशार आणि तितकाच मनमिळाऊ स्वभावाचा आहे. शालेय शिक्षण माणगाव येथे झाल्यावर उच्च शिक्षणासाठी तो मुंबईत गेला. त्यानंतर युक्रेन येथील प्रसिद्ध विद्यापीठात शिकत होता. त्याचवेळी कोरोना महामारी आणि युक्रेन महायुद्धाच्या जीवघेण्या परिस्थितीत तातडीने माणगावला परत आला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून त्या युद्धजन्य संग्रामातून वेळीच सहिसलामत भारतात आला. एखाद्याने शिक्षण अर्धवट सोडले असते. परंतु तो स्वस्थ बसला नाही. शिक्षणाची आवड आणि डॉक्टर व्हायचेच असल्याने त्याने खूप मेहनत आणि प्रयत्न करुन रशिया येथील सुप्रसिध्द विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेउन MBBS चे शिक्षण स्वतःच्या गुणवत्तेवर पूर्ण केले.

माणगाव शहरातील खांदाड गावातील डॉ.सिद्धेश पवार हा MBBS होणारा पहिलाच डॉक्टर असून कुणबी समाजातील परदेशातील डॉक्टर ही उच्चतम पदवी मिळविणारा पहिलाच डॉक्टर झाला आहे. याचा खांदाड आणि माणगाव तालुक्यातील कुणबी समाजाला सार्थ अभिमान वाटत आहे.

माणगांवचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार हे राजकारणात असूनही सिद्धेश यांनी वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेले यश अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. त्याचे सर्व मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. शिवसेना पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना प्रवक्ते ॲड.राजीव साबळे, शिवसेना तालुकाप्रमुख महेंद्र माणकर, खांदाड गाव प्रमुख काशिराम पवार तसेच शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी खास अभिनंदन करुन डॉ.सिद्धेश पवार याला शैक्षणिक आणि वैद्यकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धेशने डॉक्टर होऊन आपली सिद्धता सिद्ध करुन समस्त कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. आपल्या यशाचे सारे श्रेय आई, वडील आणि शिक्षक यांना देत आहे असे डॉ. सिद्धेशने सांगितले आहे. या यशाबद्दल बद्दल सिद्धेशचे मनस्वी अभिनंदन आणि कौतुक करुन त्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close