रोह्यात भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष परशुराम माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण…… 

[avatar]

रोह्यात भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष परशुराम माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण……

रोहा (संतोष सातपुते)भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष परशुराम माने यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. (१७) रोजी रोहा तालुक्यातील बोरघर ते तळाघर व बोरघर ते लांढर या कालवा रोडला वृक्षारोपण करण्यात आले.

वसुधा टिमने सुमारे ५० वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपनाचे यांचे नियोजन करण्यात आले. तर मोठ्या प्रमाणावर तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे त्यामुळे उष्णता वाढीस कारणे ठरु शकते . निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एकमेव मार्ग असतो तो म्हणजे वृक्षारोपण, या वृषारोपनामुळे सावली तर जमीन तापणार नाही. झाडाच्या खालच्या बाजूला शोधलेल्या पाण्यामुळे जमीन थंड होते. झाडांमुळे सुटणाऱ्या वाऱ्यामुळे गारवा निर्माण होतो . हवेत कार्बन डायॉक्साईड शोषून मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन उत्सर्जनापासुन वायुप्रदूषणावर नियञंण होत असे या मित्र परिवाराचे वृक्ष लागवडी निमित्ताने उद्दिष्ट आहे.

या वेळी रोहा तालुका भाजपा अध्यक्ष अमितजी घाग , राजमुद्रा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष राजेश भगत स्वप्नील भगत, श्रीकांत दरडे, विपुल भगत, विशाल भगत, प्रणित माने, प्रथमेश माने, युवराज माने, प्रसाद माने, गणेश कडव, निखिल वाळंज, प्रणित भगत, विजय भगत, सागर भगत, जगदीश माने, हरेश भगत, विवेक बामुगडे, प्रतिक भगत, अक्षय भगत, दिवेश भगत, मनोज सुटे , मैत्री प्रतिष्ठान संस्थापक निलेशजी वारंगे, महेश खांडेकर, भरत महाडिक, अक्षय वारंगे, नारायण चितळकर यासह मित्रपरिवार उपस्थित होता.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close