इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्सच्या सीआरएस फंडातून दिघोडे ग्रामपंचायतीला घंटागाडी; आमदार महेश बालदी यांच्या हस्ते लोकार्पण….. 

[avatar]

इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्सच्या सीआरएस फंडातून दिघोडे ग्रामपंचायतीला घंटागाडी; आमदार महेश बालदी यांच्या हस्ते लोकार्पण…..

 

पनवेल (प्रतिनिधी) इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्सच्या सीआरएस फंडातून दिघोडे ग्रामपंचायतीला स्वच्छतेसाठी घंटागाडी देण्यात आली असून त्याचे लोकार्पण आज(दि. १५)  आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. दिघोडे ग्रामपंचायतीला घंटागाडी मिळावी, अशी मागणी सरपंच किर्ती निधी ठाकूर यांनी सदर कंपनीकडे केली होती. या मागणीचा पाठपुरावा आमदार महेश बालदी व कामगारनेते जितेंद्र घरत यांनी कंपनीकडे केला होता. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीला घंटागाडी देण्यात आली.

           यावेळी बोलताना आमदार महेश बालदी यांनी, घंटागाडी लोकार्पण सोहळा हा एक निमित्त असून गाव स्वच्छ व सुंदर होण्यासाठी जे काही माझयाकडून लागेल ते सर्व सहकार्य करीन, असे आश्वासन दिले. तसेच जी काही विकासकामे माझ्या कडून गावाला अपेक्षित आहेत ती कामे कामे लवकरात लवकर करण्याचेही त्यांनी यावेळी बोलताना आश्वासित केले. 
कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने सीईओ अतुल खराटे यांनी आपले विचार मांडताना, आमच्या कंपनीकडून गावाच्या दृष्टीने जे काही चांगले आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि पुढेही करत राहू, असे सांगितले.
           या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, कामगारनेते जितेंद्र घरत, प्रसाद पाटील, देवेंद्र पाटील, अजित पाटील, निलेश पाटील, भाजपचे दिघोडे अध्यक्ष राजेश पाटील, समीर मढवी, रमेश पाटील, चंद्रकांत कडू, सुभाष माळी, ग्रामपंचायत सरपंच अभिजित पाटील, खोपटे सरपंच सौ. ठाकूर, सुचित्र घरत, अनंता म्हात्रे, कैलास म्हात्रे, अलंकार कोळी, अतिश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, व्यवस्थापनाकडून भूपेश शर्मा, संदीप काळे, सतीश म्हात्रे, प्रफुल्ल ठाकूर, परमानंद ठाकूर आदी उपस्थित होते. 

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close